ब्रेकिंग

पाचोरा | जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल स्वातंत्र्य दिन उत्साहात

पाचोरा | जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन एक विशेष उत्साहात साजरा करण्यात आला, संस्कृती आणि शिक्षणाचा एक अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्र प्रेमाचा आदर्श निर्माण केला. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण शाळेचे अध्यक्ष  दिनेश बोथरा यांच्या हस्ते झाले.

देशाची शान तिरंगा ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. ज्याने सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. नृत्य,गाणे,नाटक,कविता वाचन आणि भाषणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशभक्ती पूर्ण भावनांचे प्रदर्शन केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक घटनांवर आधारित नाट्यप्रस्तुतीने सर्वांचे मन मोहून घेतले.छोटे वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वातंत्र्यवीरांचे पोषक परिधान करून त्यांनी केलेल्या कार्याचे सर्वांना आठवण करून दिले.न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमाने समाजातील सर्व स्तरांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक जाणीव जागवण्याचे काम केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या महत्त्वाची जाणीव होण्यास मदत झाली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया,गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर,शेखरकुमार धाडीवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, साविता माळी, रूपाली देवरे,चेतना पाटील, अश्विनी पाटील, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, रुक्मिणी कासार, पुजा देसले,निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील,शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांनी विजेत्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे