आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यातील पुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात पावसामुळे रस्त्यांवर झाली डबकी, चिखलामुळे नागरिकांचे हाल…!

रस्त्यांची दुरवस्था; उपाययोजना करण्याची मागणी..

पाचोरा शहरा लगतच्या  पुनंगाव ग्रामपंचायत हद्दीतील नवीन वसाहतींमध्ये पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखल रस्त्यावर साचलेली डबकी हे विघ्न असून ते लवकर दूर करावे, अशी मागणी ग्रामपंचायतला केले असूनही परिसरातील गणेशोत्सव चिखल, डबक्यातून होणार का? असा प्रश्न प्रत्येक नागरिकांना पडत आहे.

पुनंगाव ग्रामपंचायत हद्दीतील  पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखल पाण्याची ठिक ठिकाणी डबकी सचल्याने ऐन गणेशउत्सवात दैनंदिन कामकाज करतांना रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुनंगाव ग्रामपंचायत हद्दीतील समर्थ व्हॅल्ली रोड,  देवदत्त नगर, अमृत नगर, राधाकृष्ण माऊली नगर परिसरात मध्यम स्वरूपातील पावसामुळे येथील सदर वसाहतींमधील कच्च्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. कच्च्या रस्त्यांवर छोटी मोठी पाण्याची डबकी व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. समर्थ व्हॅल्ली रस्त्यावर  मोठाली डबकी तयार झाली आहेत त्या डबक्यांमधून विध्यार्थी आणि येणाऱ्या व जाणाऱ्यांना डबक्यातले पाणी तुडवत ये-जा करावी लागते. या प्रकारामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. सदर परिसरात गटारी नाहीत, रस्त्यावर लाईट नसल्याने रात्री ये जा करणाऱ्यांना खूप त्रास दायक ठरत आहे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय योजना नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे