जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व श्री वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने साकेत सोनार यांचा सत्कार..
Pachora | संपूर्ण भारतात पाचोरा तालुक्याचे नाव लैकिक केले. एकूण तीन परिक्षा उत्तीर्ण होऊन बीग बी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्याचा सन्मान साकेत सोनार यांना मिळाला. ही पाचोरावाशियांना खूप अभिमानाची बाब ठरली. या शो मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खूप शांतपणे विचार करून निर्णयक पद्धतीने दिले. यात साकेतने एकूण बारा लाख पन्नास हजार रु जिंकले. त्यानिमित्ताने साकेत सोनार यांचा सत्कार संचालक महेंद्रकुमार हिरण व स्कूल कमेटी चेअरमन लालचंद केसवानी यांनी केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, साविता माळी, रूपाली देवरे, चेतना पाटील, अश्विनी पाटील, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे,शितल महाजन,स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, शालिनी महाजन, रुक्मिणी कासार, पुजा देसले, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांनी साकेत सोनार याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



