ब्रेकिंग
अंमळनेर श्रीमंगळ जन्मोत्सव महासोहळ्यानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत
झूम ऑनलाईन मीडिया
अमळनेर येथील श्रीमंगळ ग्रह मंदिर येथे श्री मंगळ ग्रह देवतेची स्वयंभू अतिजागृत व अतिदुर्मिळ एकमात्र मूर्ती असून, सदर ठिकाणी दर २७ वर्षांनी येणाऱ्या श्री महामंगळ महायोगाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित राहून दर्शन घेतले, व येथील विविध विकास कामे व सेवा सुविधांचे लोकार्पण केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी जि.प.सदस्य जयश्रीताई अनिल पाटील, धरतीताई पाटील, भैरवी वाघ-पलांडे ई. प्रमुख उपस्थितीत होते.



