Pahur Road Accident | पाचोऱ्याच्या डॉली पेंढारकर यांची हत्याच, आरोपी मोकाटच..! न्याय मिळाला नाहीतर परिवार आत्मदहन करणार असे निवेदन देण्यात आले..
पाचोरा (बहेरपुरा) शहरातील बांधकाम साहित्य पुरवठादार आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर इंद्रदेव पेंढारकर यांच्या कन्या डॉ. स्नेहल प्रीतम रावते (डॉली किशोर पेंढारकर) यांचे 16 जुन 2025 सोमवार रोजी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ मागून येणार्या अवजड वाहनाने जबर धडक दिल्याने दोन्ही बाप लेक धडकेत जबर जखमी झाले होते त्यात डाॅ.स्नेहल ह्यांचे दुर्दैवी निधन झाले होते महिना उलटला अजूनही निर्दयी आरोपी मोकाट असून त्यांच्यावर खटला फास्ट ट्रकवर चालवून संशयीत आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी जळगाव पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी महापौर सदाशिव टेकळे, संजय परदेशी, बापू हटकर पृथ्वीराज वाघ, अशोक पेंढारकर, दीपक न्हायरे, किशोर पेंढारकर, संगीता पेंढारकर, मनीषा पवार, उषा रावते, वंदना वाघ, मंगला सोनवणे, सिंधुबाई सोनवणे सह इतर बांधव उपस्थिती होते
खालील स्वरूपाचे निवेदन देण्यात आले वाचा..
महोदय..
उपरोक्त विषयान्वये आपणास कळवू इच्छितो कि पहूर ते शेंदुर्णी दरम्यान गोंदेगांव ता. जामनेर जवळ दिनांक 16.06.2025 रोजी सांय साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास मी माझी कन्यासह जामनेर हून पाचोरा माझी दुचाकी कमांक एम एच 19 सिव्ही 5888 ने घरी जात असतांना पहूर कडून शेंदुर्णी जाणारे डंप्पर क्रमांक एमएच 19 4102 याने मागुन सुसाट येवून माझ्या दुचाकीला जाणीवपुर्वक जोरात धडक मारली. घडक इतक्या जोरात होती की मागे बसलेली माझी सुकन्या डॉ. स्नेहल प्रितम रावते (एम. डी. डॉ स्नेहल किशोर पेंढारकर) हि धडक बसल्यावर जागेवर खाली पडली. मी व दुचाकी धडकेमुळे पुढे रस्त्यालगतच्या खडडयात पडलो. स्नेहल जागंवर पडल्यामुळे व धडक देणारे वाहन सुसाट असल्याने तीच्या अंगांवरून वाहन चालवले व त्यात तिचा प्राण गेला. सदर वाहन चालक सुनिल बीसन रेस्वाल रा. रावळा ता. सोयगांव जि. छ. संभाजीनगर हा अपघात झाल्यावर तिथे कोणी नाही हे बघुन न थांबता निघुन गेला.
पोलीसांना अदयापही वाहन मालक धनराज आनंदा मोरे रा. टाकळी ता.जामनेर व वाहन क्लिनर सुरज यादव रा. झारखंड यांचा शोध लागला नाही. ते फरार च आहेत. अपघात झाल्यानंतर हया तिघांनी मिळून वाहनाचे पुढील भाग व टायर पाण्याने स्वच्छ करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नंतर तीन दिवसांनी वाहन पोलीस स्टेशन ला जमा केले. फॉरेन्सीक टिम ने टायर वरील रक्त जे स्वच्छते नंतर ही मिळाले ते व रस्त्यावरील रक्त चे नमुने तपासले असता ते बरोबर जुळाले असे समजले.
माझी आर्थिक परिस्थिती नसतांना मुलगी अभ्यासु आहे म्हणुन तिला डॉक्टर केले. मुलगी शिकवली पण असे नियम न पाळता मोकाट रस्त्यावर वाहन चालवणारे व शासन त्यांचेवर काहीच कार्यवाही करत नसल्याने मुलगी वाचवू शकलो नाही याचे प्रचंड दुख्ख आहे. मुलगी शिकवा मुलगी वाचवा हे शासनाचे धोरण अशामुळे कुचकामी ठरते. ज्या दिवशी तीचा एम. डी. पास झाल्याचा निकाल आला तेव्हा आम्ही तिच्यावर अंतीमसंस्कार ची तयारी करत होतो तीला शेवटची माहेरची साडी अंगावर टाकत होतो यापेक्षा मोठे दुःख काय असु शकते साहेब यावर आपण विचार करावा ही हया अभागी पित्याची हात जोडून आपणास विनंती आहे. ही अशीसमाजास घातक टरणारे लोकांचा आपण बंदोबस्त करावयास हवा म्हणजे अजुन कोणाची मुलीचा खुन होणार नाही.
इतक सगळे घडल्यावर स्थानिक पोलीसांनी वाहन चालक, मालक व क्लिनर यांचेवर किरकोळ अपघातचा गुन्हा दाखल करून सोडून देण्यात आले. अशा गंभीर हत्तेनंतर तर यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोदवायला हवा होता. त्यांचे माबाईल चा सिडीआर काढून चौकशी करावी व फरार क्लिनर सुरज रेहूल रजा (सुरज यादव) रा. तापीत बहेरा हजीरी बाग झारखंड याचा शोध घेउन अटक करावी तसेच वाहन मालक चालक यांचेवर खुनाचा गुन्हा नोदवून हा खटला फास्ट कोर्टात चालवून आरोपींना शासन करावे व आम्हास न्याय मिळवून दयावा. आम्ही कायदयाचे पालन करणारे कायदयाचा आदर करणारे लोक आहोत त्यामुळे अपेक्षा बाळगुन आहोत की न्याय आम्हास मिळेल. जर आम्हास न्याय मिळाला नाही सदर आरोपींवर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल झाला नाही तर मला परिवारासह आत्मदहन करावे लागेल. कारण आम्ही आमच सर्वस्व गमावले आहे.



