आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा शहरातील न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल येथे विविध स्पर्धेच्या विजेतांना बक्षीस वितरण..

  • पाचोरा | दिलीप जय परदेशी

पाचोरा शहरातील न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल येथे चित्रकला मधील रंगोत्सव तसेच ओलंपियाड मधील विविध विषयांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ मोठया उत्साहात पार पडला असून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. 

आज न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल पुनगाव रोड, चित्रकला (ड्रॉइंग) मधील रंगोत्सव तसेच ओलंपियाड मधील विविध विषयांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन  मुस्तफाभाई भडगाववाला, व्हाईस चेअरमन मुनव्वरभाई बदामी, प्राचार्य ज्ञानेश्वर देवरे, सुपरवायझर श्रीमती सुमित्रा जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सोमवंशी मॅडम यांनी केले.

रंगोत्सव स्पर्धेमध्ये थंब प्रिंटिंग, ड्रॉइंग, कलरिंग, हॅन्डरायटिंग,  कोलाज अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी, मेडल आणि गिफ्ट देण्यात आले. तसेच ओलंपियाड परीक्षेमध्ये मॅथ, सायन्स, कॉम्प्युटर, इंग्लिश, जी.के. अशा विविध विषयांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांना पहिल्या तसेच दुसऱ्या लेव्हलमध्ये कॅश प्राईज, गिफ्ट, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्राँझ मेडल मिळाले. सर्व विजय विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुण्यांकडून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात आले. अशा पद्धतीने कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

करा आपली अशी जाहिरात.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे