Namdev Maharaj | पाचोऱ्यात संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा..
पाचोरा | भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पाचोरा शहरातील रामदेव लाँन्स येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशिय मंडळ व शिंपी समाजाच्यावतीने श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५वा संजीवन समाधी सोहळा रामदेव लाँन्स येथे आयोजित करण्यात आला होता. सत्यनारायणाची महापुजा करून महीलांचा हळदकुंकू करुन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनवणे व महीला मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते झाले . त्यानंतर सर्व मंडळाच्या पदाधिकारी व जेष्ठ सभासद मार्गदर्शक यांनी पुजा केली.
तसेच ह.भ.प.योगेशजी महाराज धामणगांवकर यांनी त्यांच्या मधुर आवाजात नामदेव महाराजांचे बालपण, त्यांचे अध्यात्म त्यांची भक्ती यावर उदाहरणे देऊन प्रत्येकासमोर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज चित्रीत केले. शेवटी पांडुरंगाची आरती घेऊन किर्तनाची समाप्ती केली,
मंडळाचे वयोवृध्द दानशूर व्यक्तीमत्वाचे भानुदास खैरनार यांचा लग्नाला 60 वर्ष पुर्ण झाले होते. म्हणून त्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता, मंडळाच्या वतीने उभयतांना नवीन वस्त्र देऊन अंतरपाट धरून ब्राह्मण देवतेने मंगलाष्टके म्हतली आणि विधीवत लग्न लावले.
पाचोरा तालुक्यातील शिंपी समाजातील 12 वी व 10 वी गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना जीवराज खैरनार यांनी दिलेल्या ट्राफी , प्रशस्ती, पुष्पगुच्छ व नारळ देऊन सत्कार केला, तसेच अबोली दादाभाऊ मांडगे हीने आय.आय.टी. पवई येथील शिक्षण उच्चतम गुणांनी पुर्ण करुन भारत सरकार मार्फत पुढील शिक्षण लंडन येथे करण्यासाठी केद्रसरकार भारतातुन दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75 लाखाची शिष्यवृत्ती मीळते ती शिष्यवृत्ती कु अबोली हीने मीळवली म्हणून तीचा शाल पुष्पगुछ देऊन सत्कार केला, तसेच युवक मंडळासाठी अध्यक्ष म्हणून पीयुष दिलीप शिंपी व महीला मंडळाची नुतन कार्यकारणी घोषित अध्यक्ष म्हणून श्रीमती रीना चेतन भांडारकर यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाँ दिलीप शिंपी व गिरीष जगताप यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन जनार्दन सोनवणे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.



