पाचोरा तालुका सहाय्यक कृषीधिकारी चोधरी यांची कुऱ्हाड परिसरात कृषी केंद्रात तपासणी…
शेतकऱ्यांना देखील युरियाला पर्याय म्हणून नॅनो युरिया व नॅनो डी ए पी वापरण्यावर भर देण्याबाबत मार्गदर्शन देखील केले.
पाचोरा तालुक्यात कृत्रिम युरिया टंचाईच्या तक्रार अनुषंगाने तालुक्यातील कुऱ्हाड परिसरात सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र बी चौधरी यांनी तालुक्यातील कुऱ्हाड परिसरात खत विक्रेते दुकानांवर भर पावसात तपासणी केली तसेच त्यांच्या ई-पॉस मशीन व युरिया साठा रजिस्टर तसेच गोडाऊनचीही तपासणी केली.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका पाचोरा अंतर्गत मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या आदेशाने तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवारी पाचोरा तालुक्यामध्ये खतांची होणारे लिंकिंग व युरिया बद्दल प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तालुक्यात सर्व खतविक्रेते केंद्रांवर अधिनस्त सहाय्यक कृषी अधिकारी यांना खत वाटपात होणारी लिंकिंग पूर्ण थांबणेकामी त्यांच्या समक्ष खतवाटप केंद्रांवर उपस्थित राहून शेतकऱ्यांना माफक दरात खतपुरवठा नियमित वितरित होईल याबद्दल कामकाज करण्याचे आदेशित केलेले असून त्या अनुषंगाने मौजे कुऱ्हाड खू येथे आर बी चौधरी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी अचानक सर्व खत विक्रेते दुकानांवर भर पावसात तपासणी केली तसेच त्यांच्या ई-पॉस मशीन व युरिया साठा रजिस्टर तसेच गोडाऊनचीही तपासणी केली व कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार लोकप्रतिनिधी व कृषी विभागाकडे येणार नाही याची दक्षता घेत सर्वांनी शासकीय किमतीनेच सर्वांना समप्रमाणात खतपुरवठा होईल अशा सूचना दिल्या. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना देखील युरियाला पर्याय म्हणून नॅनो युरिया व नॅनो डी ए पी वापरण्यावर भर देण्याबाबत मार्गदर्शन देखील केले.
कुऱ्हाड परिसरात परिश्रम ऍग्रो , श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र , सर्वज्ञ कृषी भांडार, विजय कृषी केंद्र, दुर्गेश कृषी केंद्र यांच्या विक्री केंद्रांवर तपासणी करण्यात आली.



