पाचोरा शहराजवळील शेतशिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर ?
बिबट्या हा मांजर कुळातला असल्याने रंगसंगतीमुळे पाहणाऱ्यांना रानमांजर बिबट्या वाटत असतो
पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरा जवळील असलेल्या सारोळा बुद्रुक शिवारात बिबट्या सदृश प्राण्यांचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली होती काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी वनविभागास तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आसता, तात्काळ वनविभाग शेतातपाहणी केली व शेतकऱ्यांना बिनधास्त शेतात काम करण्याचे आवाहन वनअधिकारी मुलाणी यांनी केले.
पाचोरा शहरा लगत असलेल्या सारोळा शिवार येतो या परीसरात सचिन सोमवंशी यांच्या शेताच्या बाजुला असलेल्या किरण भदाणे हे आपल्या शेतात मक्याचे शेताला पाणी भरत असतांना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेला आढळून आला सबंधित शेतकरी ने बिबट्या च्या दहशतीतच आपल्या मोबाईलवरच फोटो काढून सचिन सोमवंशी सह इतरांना हि बातमी सांगण्यासाठी आला असता बिबट्या सदृश्य प्राणी ने पोबारा केला. बिबटय़ा च्या वार्ताने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने तात्काळ बिबट्या सदृश्य प्राण्याचा शोध घेवुन जेरबंद करण्यात यावे अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असता वनविभागाचे प्रमुख आर एस मुलाणे यांना कळविले असता ते आपल्या पथका सह पोहचले मात्र यावेळी शेतकऱ्यांने पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटलेले दिसले नाही, तसेच त्यांना फोटो दाखवण्यात आले असता त्यांनी फोटोतील बिबट्या नसून रानमांजर असल्याचे सांगत वनविभागाचे प्रमुख आर. एस. मुलाणे यांनी स्थानिक शेतकऱ्यांना घाबरु नका बिबट्या ने आज पर्यंत लोकांवर हल्ला केलेला नाही आपल्या परिसरात असे काही आढळले तर तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा आपला रब्बी चा हंगाम आपण बिनधास्त शेतात काम करण्याचे आवाहन केले आहे.



