महाराष्ट्र

धक्कादायक..! अमरावतीमध्ये झाडाला गळफास लावून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या!

निलेश पाटील

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा येथील पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काळ शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट रोज .मागील सहा महिन्यांपासून उपनिरीक्षक अनिल मुळे हे प्रकृतीच्या कारणाने वैद्यकीय रजेवर होते. हि घटना शेगाव रहाटगाव रोड वरील एका अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दुपारच्या वेळी घडली. मुळे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समोर आले नसून नांदगाव पेठ पोलिससंदर्भात पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहिती नुसार शुक्रवारी दुपारी परिसरातील काही नागरिकांना मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यांनी त्वरित नांदगाव पेठ पोलिसांना या संदर्भात संपर्क साधला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या समवेत पीएसआय देशमुख, पीएसआय तेलगोटे, कॉन्स्टेबल खारोडे,रुपनारायण हे काही वेळातच घटनास्थळी दाखल आणि मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसून आत्महत्येचे नेमके कारण प्राथमिक तपासात समजले नाही.

राजापेठ पोलीस ठाण्यात पीएसआय अनिल मुळे हे कार्यरत होते. यापूर्वी दोन महिने मुळे यांनी वैद्यकीय राजा घेतली होती त्यानंतर पुढील चार महिन्यांपासून ते कामावर गैरहजर होते. सर्व सामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अनिल मुळे परिचित होते. मुळे यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आहे. या धक्कादायक घटनेमुळे पोलीस यंत्रणेमध्ये शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे