आपल खान्देश

चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना आ मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सुरक्षा पेट्यांचे वाटप

आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ३ हजार हुन अधिक बांधकाम कामगारांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला

बांधकाम कामगारांच्या येणाऱ्या पिढीच्या हातात कामगारांच्या पेट्या नाही तर पुस्तकांच्या पेट्या आल्या तर मला जास्त आनंद होईल- आ मंगेश चव्हाण.

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ६७ बांधकाम कामगारांना सुरक्षा पेट्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन आमदार मंगेश चव्हाण जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.

बांधकाम कामगारांना एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आपली रोजंदारी सोडून अनेक दिवस चाळीसगाव- जळगाव फेऱ्या माराव्या लागतात. यात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून गेल्या २ वर्षांपासून आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ३ हजार हुन अधिक बांधकाम कामगारांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ हा कुठल्याही प्रकारच्या फेऱ्या न मारता व एक रुपयाही त्यांच्याकडून न घेता दिला गेला. त्यांच्या एका कामगारा मागचा १०० रुपये पर्यंतचा शासकीय खर्च हा आमदार कार्यालयाच्या मार्फत केला गेला

ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार हा अतिशय हलाखीत आपला संसारगाडा ओढत आहॆ . मात्र वर्षानुवर्षे कष्ट करून देखील त्यांची परिस्थिती बदलत नाही. यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षण घेऊन प्रगती केली तरच त्यांची परिस्थिती बदलू शकते. यासाठी येत्या काळात कामगारांच्या मुलांच्या हातात कामाच्या पेट्या नाही तर पुस्तकांच्या पेट्या आल्या तर मला जास्त आनंद होईल व त्यासाठी आमदार म्हणून नव्हे तर कष्टकऱ्यांच्या कुटुंबातील एक घटक म्हणून सदैव मदत करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यावेळी आपली भावना व्यक्त केली.

यावेळी पं.स. गटनेते संजय तात्या पाटील, मार्केट कमिटी माजी सभापती सरदार शेठ राजपूत, मार्केट कमिटी माजी उपसभापती किशोर भाऊ पाटील, माजी नगरसेवक आनंद खरात, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पं स सदस्य सुभाष पाटील, सरपंच उपखेड महेश मगर, सरपंच चिंचगव्हाण एस के राठोड सर, सरपंच तामसवाडी शिवदास पाटील, पातोंडा सरपंच बापू, लोंजे ग्रामपंचायत सदस्य बळीराम चव्हाण, रवींद्र पाटील, भाजपा सोशल मीडिया प्रमुख बाजीराव अहिरे, मोहन गुजर, विजय पाटील सूत्रसंचालक तथा भाजपा शहर सरचिटणीस अमोल नानकर आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे