आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील आखतवाड्यात शिव छत्रपती, राजमाता अहील्यादेवी होळकर यांचे स्मारक पूर्ण..


पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन @ संजय परदेशी.

पाचोरा-भडगांव विधानसभा मतदारसंघाचे  आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात गाव तिथे ‘शिवस्मारक’ ही संकल्पना राबविल्याने आखतवाडे येथेही शिवस्मारकाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. 

आखतवाडे येथील ग्रामस्थांकडून शिवसेना जिल्हाध्यक्ष यांना धनगर समाजाचे आराध्य दैवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावातील धनगर समाजाने केली आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने विद्यमान आमदारांनी यांनी आखतवाडे येथे अहील्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधकामासाठी निधी मंजुर केले. 

त्यामुळेच आखतवाडे येथील ग्रामंस्थांच्या मागणीमुळेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जिल्ह्यात पहिले स्मारक आखतवाडे येथे ऊभे राहीले आहे. हे दोन्ही स्मारक दिमाखात उभे राहील्याने आखतवाडे येथील शिवप्रेमी आणि धनगर समाज बांधवांकडुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे