राज्यात प्रथमच जळगाव ‘पत्रकार प्रीमियर लीग, पाचोरा तालुक्यातील पत्रकार उतरणार मैदानात..
पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेला हा पहिलाच उपक्रम ठरेल..
जळगाव | झूम मराठी ऑनलाईन | दिलीप परदेशी
पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा तालुक्यातील पत्रकार यंदा प्रथम उतरणार मैदानात.
समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही. यासाठी पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असून, वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम खान, सचिन गोसावी, जकी अहमद यांनी यास्पर्धेचे आयोजन केले आहे. पाचोऱ्या तालुक्यातुन पत्रकार नंदकुमार शेलकर, प्रविण ब्राह्मणे, राहुल महाजन, प्रविण बोरसे, दिलीप परदेशी, निखील मोर, जावेद शेख, प्रमोद बारी, नरसिंग भूरे आकाश सुर्यवंशी, दिपक पवार, अनिल सावंत, नितीन पाटील हे खेळाडूची निवड करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि कल्याणासाठी उपक्रम राबविण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. याच अनुषंगाने, आम्ही दि.१०, ११, १२ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदान याठिकाणी पत्रकार प्रीमियर लीग आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा जिल्हाभरातील पत्रकारांना एकत्र करून खेळली जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांचा एक संघ असणार आहे. पत्रकारांमधील सुसंवाद, खेळण्याची वृत्ती आणि मैत्री वाढवण्यासाठी स्पर्धेतून एक उत्तम संधी निर्माण होईल, असा आम्हाला विश्वास आहे. संघात १३ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक सामना ८ षटकांचा राहणार असून टेनिस बॉलवर खेळला जाईल.



