आपल खान्देश
किरण माळी सर महात्मा ज्योतिबा फुले गुण गौरव पुरस्काराने सन्मानीत
झूम मराठी
खान्देश साहित्य संघ सुरत शाखा गुजरात, महात्मा ज्योतिबा फुले सेवाभावी ट्रस्ट सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आज आंतरराज्य बहूभाषीक कवि संमेलन व पुरस्कार सोहळा कार्यक्रमात दहिवद गावाचे सुपूत्र व अमळनेर शहरातील नामांकित आय के डी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण माळी सरांना सोनी मराठी चे मराठी हास्य जत्रेचे कलावंत शामकांत राजपुत यांच्या हस्ते “महात्मा ज्योतिबा फुले गुण गौरव पुरस्कार” देण्यात आला किरण माळी सरांसोबत पुरस्कार स्विकारतांना दहिवद येथील मित्र परिवार प्रविण आबा माळी सह जयवंत पाटील, पन्नालाल मावळे, सुरेश माळी, शिवाजी माळी, देवानंद बहारे, अनिल माळी, गोपाल शिंपी, विकास महाजन हजर होते. किरण माळी सरांना शुभेच्छा देण्यात आल्या.



