पाचोरात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई..!
एकुण ८ ट्रॅक्टर, १ डंपर व २४ दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे
- पाचोरा – झूम मराठी ऑनलाईन
अवैध गौण खनिज व वाळू चोरी, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात करून वाहन जप्त करण्यात आली आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर विशेष मोहिमे अंतर्गत ८ ट्रॅक्टर, १ डंपर व २४ दुचाकांवर कारवाई कारवाई करण्यात आली असून, सदर माहिती 29 डिसेंबर रोजी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कवीता नेरकर, मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदशनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याच्यावतीने मोटार सायकल चोरी व अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी वाहनांविरुध्द दिनांक २८/१२/२०२४ रोजी पासुन पाचोरा पोलीस स्टेशन हददीत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन व विना नंबर प्लेट वाहन चालकांविरुध्द धडक मोहिम सुरु करण्यात आलेली असून आज पर्यंत एकुण ८ ट्रॅक्टर, १ डंपर व २४ दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही यापुढे देखील चालणार असुन नागरीकांनी आपल्या वाहनावर नंबर प्लेट लावुन वाहनाचे कागदपत्र जवळ बाळगावे व वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे.




