आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ते नगरदेवळा रस्त्याचे काम पुढे पाठ, मागे सरसफाट..!

नगरदेवळा रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे

पाचोरा तालुक्यातील आखतवाडेसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा आणि चाळीसगावकडे जाण्यासाठी अत्यंत कमी अंतराचा महत्वपूर्ण असलेला आखतवाडे नगरदेवळा हा रस्त्यावर काम सुरु असून हे कामचालवू असून पुढे काम सुरु असतांनाच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. पुढे पाठ आणि मागे सरसपाट असेच म्हणता येईल तरी प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे.

नगरदेवळा रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाच दर्जा निकृष्ट असल्यामुळे नवा डांबरी करण रस्ता किती काळ टिकेल याची खात्री नाही.

आखतवाडे ते नगरदेवळा रस्त्याच्या सुमारे चार की.मी. अंतराच्या खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरु असून सदर काही दिवसापूर्वी निकृष्ट कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी अडवणुक केली. परंतु पुन्हा परिस्थिती जैसेथे झाली. डांबराचा अभाव असल्यामुळे खडी आताच उचकुटू लागली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा तयार होणारा रस्ता खड्यात जाणारा आहे.

याबाबत संबंधितांना अनेक वेळा तक्रार करून देखील संबंधित ठेकेदाराकडून कामाची गुणवत्ता सुधारत नसल्याने परिसरातील वाहन चालकांमध्ये संबंधित ठेकेदार आणि अधिकारींबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, याबाबत संबंधित वरीष्ठ अधिकारींनी तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून कामाची गुणवत्ता राखावी असे बोलले जाता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे