आपल खान्देश
डॉ.शांतीलाल तेली यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयात फवारणी करण्यासाठी हात पंप देण्यात आले.

प्रतिनिधी – पाचोरा
पाचोरा- पिंपळगाव हरेश्वर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शांतीलाल तेली यांच्याकडून ग्रामीण रुग्णालय फवारणी करण्यासाठी हात पंप देण्यात आले पिंपळगाव हरेश्वर हे पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असलेले गाव आहे तसेच आजूबाजूचे बहुतेक खेडे या गावाला लागून आहेत तरी दिवसाला दवाखान्यात आठ ते दहा पेशंट कोरोना पॉझिटिव निघतात ही परिस्थिती लक्षात घेता डॉक्टर शांतीलाल तेली यांनी दवाखान्याला फवारणीसाठी हात पंप दिले ते स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहित कुमार जोहरे हॉस्पिटलचे AOS रामभाऊ जाधव हॉस्पिटल इन्चार्ज शिंदे सिस्टर.देहाडे सिस्टर.निकम सिस्टर.सफाई कर्मचारी संतोष कंडारे.प्रवीण गढरी आदी उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



