आपल खान्देश

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ ओझर अंतुर्ली भातखंडे खुर्द या गावात चांगला प्रतिसाद

प्रचारात डॉ. पूनमताई पाटील यांनी घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

 

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा (प्रतिनिधी) भडगाव – पाचोरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ वार शनिवार रोजी दुपार सत्रात प्रचार ओझर, अंतुर्ली, भातखंडे या गावांना करण्यात आला. प्रचाराचे नेतृत्व नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या कन्या डॉ.पुनमताई प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी ओझर, अंतुर्ली, भातखंडे या गावात ठिकठिकाणी त्यांना औक्षण करण्यात आले. प्रसंगी मतदार मतदानाची शाश्वती भेटीगाठीच्या वेळी देत होते. यावेळी ओझर अंतुर्ली भातखंडे गावातील स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. एकंदरीत नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे