आपल खान्देश

उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पाचोरा भाग पाचोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर दिनांक-20/11/2024 रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकामी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना आपले मतदानाचे हक्क बजाविता यावे याकरीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा या ठिकाणी टपाली मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे

18 पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत दिनांक-17/11/2024, 18/11/2024 व दि.19/11/2024 रोजी या तिनही दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यत टपाली मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. सदर वेळेत निवडणुकामी नियुक्ती केलेल्या विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतदान करता येणार आहे. 

त्या अनुषंगाने टपाली मतदानाचा पहिल्याच दिवशी म्हणजेच दिनांक-17/11/2024 रोजी महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या टपाली मतदान कक्षात जावून श्री.धनजंय येरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचेसह 64 पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला तसेच इतर मतदारांनी देखिल आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन श्री. धनजंय येरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे