आपल खान्देश
पाचोरा भडगाव विधानसभा मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज..
राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (ता.२०) सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत 355 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रसासनाने मतदान पथक केंद्रावर पोहचवण्या साठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे, मतदान केंद्रांवर सी सी टीव्ही कमेरा बसवून लाईव्ह ब्रॉडकास्ट सरू असणार सर्व मतदान केंद्रांवर निगराणी असणार आहे व पोलीस यंत्राणासहित निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
निवडणुकीचा टक्का वाढविण्यासाठी या लोकोत्सवात मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी भूषण आहिरे यांनी केले.
पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पुरेसे सुरक्षा बळ मतदार संघात उपलब्ध असून कडेकोड बंदोबस्त नियोजित केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनजंय येरुळे यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सांगितले.



