राजकीय

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे महापौरांकडून स्वागत


जळगाव (झूम मराठी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्यासह राज्यातील दिग्गज मंत्री हे आज जिल्ह्यात आले आहे. जळगाव विमानतळावर आगमन होताच महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्यासह ना.जयंत पाटील, ना.प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज मंत्री, नेते शुक्रवारी जळगावात होत असलेल्या महिला परिषदेसाठी जळगावात आले आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.

जळगाव विमानतळावर महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार, मंत्री ना.जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ऍड.रवींद्र भैय्या पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे