आपल खान्देश

डॉ. प्रियंका पाटील सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद..

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली...


पाचोरा भडगाव  विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित व लेक डाॅ.प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे. दोन्ही दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली आहे. त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांची लेक डाॅ प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर दुसरीकडे आमदाराच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात प्रचाराची मोहीम उघडली डाॅ.प्रियंका पाटील व सुमित पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हा अभुतपुर्व होता, दोघांनी बापाच्या विजयासाठी स्वत:ला झोकून दिले आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांची कन्या डाॅ.प्रियंका पाटील यांनी 18 तारखेपासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका 21 दिवसात त्यांनी घरोघर पिंजून काढून बापासाठी मत मागीतले. त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शेकडोची रॅली निघाल्या. त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले. डाॅ.प्रियंका पाटील म्हणाल्या की मला प्रत्येक गावात मिळालेले प्रेमाने भारावून गेल्याचे सांगीतले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,जय बारांवकर,जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना समवेत सूरज शिंदे,राहुल पाटील ,विशाल पाटील ,समीर शेख ,यश ठाकूर ,सागर महाजन तथा संपूर्ण शहर व ग्रामीण शिवसेना, युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सर्व सहकारी प्रचारात सहभागी झाले. 

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित ने ही 18 ऑक्टोबर पासून भडगाव तालुक्यात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले. त्यांना प्रत्येक गावात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किशोर आप्पांनी आमच्या गावाचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या वडिलांसोबत असल्याचे ग्वाही मतदारांनी दिल्याचे सांगीतले. ग्रामिण भागात त्यांचा शंभर टक्के दौरा पुर्ण झाला असून शहरात दोन दिवसापासुन प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्याच्यां समवेत पुरुषोत्तम माळी जिल्हा समन्वयक युवासेना निलेश पाटील जिल्हासघटक युवासेना नितीन महाजन उपशहरप्रमुख शिवसेना योगेश सुर्यवंशी तालुका सरचिटणीस युवासेना अनिल महाजन समाधान पाटील जगदीश पाटीलस्वप्निल पाटील तालुकासंघटक शिवसेना रविंद्र हिम्मत पाटील राहुल पाटील यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकार्यानी सहभाग नोंदवला. 

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे