आपल खान्देश

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द, जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर यांच्या मतदारांची मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना मतदारांची प्राथमिक/ तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते.

मात्र, बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका क्रमांक 11669/2021 व इतर संलग्न याचिका यात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश पारीत केलेला आहे. या आदेशास अनुसरुन सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये प्राधिकरणाकडील 6 व 21 ऑक्टोबर 2021 रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. सदर आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे.

या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे