ठाण्यात भाजपा भटके विमुक्त आघाडी कोकण विभागाची बैठक..
ठाणे (झूम मराठी ऑनलाईन) विधानसभा निवडणूकित भाजपाला सर्वात जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या कोकण विभागाची ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या कोकण विभागाची ठाण्यात हॉटेल शुभ सागर येथे कोकण विभागीय जिल्हाध्यक्ष सतीश गिरी यांच्या अध्यक्षते खाली बैठकित झाली असून, बैठकीचे सूत्रसंचालन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीस ॲड. योगेश परदेशी यांनी केले, तसेच प्रास्ताविक कोकण विभागीय अध्यक्ष सतीश गिरी यांनी केले.
या बैठकीचे विचार विनिमयातून काही सूचना मांडल्या गेल्यात त्यात येत्या विधानसभा निहाय रूपरेषा तयार करणे, भटके विमुक्त समाजाचे मतदार आकडेवारी तयार करणे, समाजात भेटिगाठीचे नियोजन करणे तसेच जिल्हाध्यक्ष यांनी विभागाला जिल्हा निहाय आकडेवारी सादर करणे असे ठरविण्यात आले. या बैठकीला ऋतुराज खैरनार कार्यालयीन सचिव हे ही उपस्थित होते.
या विषयांना गोपीनाथ नागरगोजे यांनी आणुमोदन केले (वसई विरार जिल्हा अध्यक्ष) तसेच बबनराव मोहिते यांनी आपले विचार मांडले वरील विषया नुसार काम केले तर समाजाला नवी दिशा मिळेल असे मत व्यक्त केले.
बैठकीला उपस्थित बबनराव मोहिते, गोपीनाथ नागरगोजे, विष्णू सांगळे, सतीश गिरी, योगेश परदेशी, महेश गिरी, संतोष जानकर, आसाराम गिरी, ऋतुराज खैरनार शैलेश गिरी आदी उपस्थित होते.



