आमदार किशोरआप्पा पाटील यांनी जनतेसमोर मांडले महायुतीच्या अडीच वर्षाचा लोकोपयोगी योजनांचा रिपोर्ट कार्ड..
- दिलीप जय परदेशी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचl “महायुती” सरकारने मागील अडीच वर्षांच्या विकास कामांचा व लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी जनतेसमोर मांडला, यासंबंधी पत्रकार परिषदेचे आयोजन शिवालय या संपर्क कार्यालयात येथे करण्यात आले होते.
राजकारण हे जनसेवेचे साधन आहे हे मानून सातत्याने लोकहिताचे, जनकल्याणाचे निर्णय घेणारे आमचे महायुती सरकार आहे. सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या, ज्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सरकारने निर्णय घेतले.
जनतेसमोर केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड मांडणारे हे महायुतीचे प्रामाणिक सरकार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे बोलतांना आमदार किशोरआप्पा पाटील सांगितले.
यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील समवेत बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रवीण ब्राह्माणे, प्रवीण पाटील, सुनील पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.



