भडगाव पंचायत समितीचे विस्तारीनी गिरड येथील दलित वस्तीची केली पाहणी..
भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायतने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास निधी इतर ठिकाणी वळविल्याने गिरड गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या सुधारणा झाल्या नसल्याची तक्रार गिरड ग्रामपंचायत सदस्य कैलास सोनवणे यांनी भडगाव पंचायत समितीत केली होती त्या नुसार भडगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खैरनार यांनी दलित वस्तीत कामाची पाहणी केली.
विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निधीतून अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेतर्ंगत पाणी पुरवठयांची कामे, मलनिःसारण, वीज, गटार बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिराचे बांधकाम इत्यादी विकास कामांसाठी निधीतुन ग्रामपंचायत द्वारे कामे होतात मात्र भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायतिने हा निधीद्वारे रस्ते काँकरिटिकरण अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत न करता इतर ठिकाणी वळविल्याने सदर घटक हे या सोई सुविधापासून वंचित झाल्याने त्यांनी गिरड ग्रामपंचायतीला जो निधी मंजूर केला केला आहे तो निधी अनुसूचित जाती व नवोबौधद वस्तीतच खर्च झाला पाहिजे अन्यथा अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील माणसे उपोषणास बसतील असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने भडगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खैरनार यांनी दलित वस्तीची पाहणी केली असून ते त्यांचा अहवाल सादर करणार आहेत. या विषयावर दलित वस्ती निधी वळविनाऱ्या संबंधितावर कायदेशीर कारवाई होणार नसेल तर अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील माणसे उपोषणास बसतील असे सांगण्यात आले आहे.



