भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुड शाळेच्या विद्यार्थ्यांची उतुंग झेप, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड..
- दिलीप जय परदेशी
जळगाव जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुड बु|. येथील बाबा सुंदरदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी या वर्षी वर्चस्व गाजवले, जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत हे खेळाडू सहभागी होण्यास पात्र ठरले आहेत. खेळाडूंच्या या कामगीरीबद्दल शिक्षकांच्यावतीने अभिंनदन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले आहेत. ४०० मीटर रिले – प्रथम क्रमांक पटकवला असून लोकेश सर्जेराव पाटील, साई अशोक मराठे, भावेश दीपक पाटील, मितेश बापूराव पाटील यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
धाव स्पर्धेत मयुरी श्रीकांत माली १०० मीटर द्वितीय क्रमांक पटकवला, जयेश भालचंद्र पाटील- १०० मीटर द्वितीय क्रमांक पटकावला, रेणेश शिवाजी पाटील याने 600 मिटर धाव स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला असून, सोमनाथ विकास माली- ८०० मीटर द्वितीय क्रमांक आला, भावेश दीपक पाटील – १५०० मीटर तृतीय क्रमांक पटकवला, तसेच 3000 मीटर अक्षय वाल्मिक खेडकर तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. राज कैलास खैरनार याची वयोगट 19 वर्ष मधून जिल्हास्तरीय 3000 मीटर रनिंग स्पर्धेत निवड झाली झाली.
साई अशोक मराठे – लांब उडी – द्वितीय क्रमांक खेचून आणला, लोकेश सर्जेराव पाटील- भालाफेक – तृतीय क्रमांक पटकवला असून जिल्हा स्पर्धेसाठी सर्व संघात स्थान मिळवले आहे, या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक एस. पी. पाटील सर, निलेश पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

या खेडाळूच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरम भरत व्यंकट पाटील, सचिव रविकांत सूर्यवंशी, खजिनदार नानासो अशोक पाटील, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी पाटील सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




