आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या हस्ते, नगरदेवळ्यात मनसे कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन

परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांना त्यांचे हक्काचे एकप्रकारे मदत केंद्र म्हणूनच काम करू

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडले.

नगरदेवळा शहरातील मुख्य बाजारपेठेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष कार्यालयाचे लोकार्पण करते वेळी नगरदेवळा येथील तालुका सचिव अभिषेक बोरसे तालुका उपतालुका अध्यक्ष रवी कोळी शहराध्यक्ष नगरदेवळा किरण शिंपी उपशहराध्यक्ष रमेश भोई यांच्यासह गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यालयाचे लोकार्पण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, नगरदेवळा परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांना त्यांचे हक्काचे एकप्रकारे मदत केंद्र म्हणूनच काम करू असे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी सांगितले त्यावेळी जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णा दूंदुले, शहराध्यक्ष निलेश मराठे, अक्षय पाटील, अमोल कांबळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे