आपल खान्देश

माता चंडिका पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर

आ.चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश : पाटणादेवीच्या गळ्यात २० कोटींच्या विकासनिधीची माळ..


 

चाळीसगाव तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठीच नाही तर सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासासाठीही हजारो कोटींच्या विकास निधीचा ओघ वाहत ठेवणा-या आ. मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळवित तालुकावासियांना नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर अनोखी भेट दिली आहे. यामुळे या पुरातन तीर्थ व पर्यटनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. खान्देशातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन क्षेत्र असा यास्थळाचा लौकीक असून तो अजून वाढणार आहे.

पाटणादेवी हे चाळीसगाव तालुकावासियांचेच नव्हे तर अवघ्या खान्देशवासियांचेही कुलदैवत आहे. नवसाला पावणारी असे माता चंडिकेचे अधिष्ठान असून थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची ही तपोभूमी आहे. पुराणकाळापासूनच यापरिसराचे मोठे वैशिष्ट्ये राहिले आहे. निसर्ग व प्राणी, पक्षी संपदेने हा परिसर सुजलाम – सुफलाम आहे. येथे गणितनगरी साकारण्याची स्वप्ने काहींनी दाखवली. मात्र गणित नगरीच्या नावाने एक वीटही त्यांना ठेवता आली नाही. राजकारण मात्र १० वर्ष केले. ही वस्तूस्थिती असून गेल्या अनेक वर्षात पाटणादेवी तीर्थक्षेत्राचा शाश्वत विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच निधी मिळविण्यात आ. चव्हाण यशस्वी ठरले आहे. निधी मंजूर झाल्याने भाविकांसह पर्यटन, पर्यारवणप्रेमी व खगोल अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे