आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यातील एका “दांडीयाकिंग” यांचा पहिल्याच दिवशी दांडिया खेळतांना मृत्यू…!

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील भडगाव रोडवरील एका दांडीया गरबा कार्यक्रमात सव्वीस वर्षीय युवकाचे खेळतांना हृदय विकाराने मृत्यू झाल्याने शहरातील दाडींया प्रेमींमध्ये शोककळा पसरली.

पाचोरा शहरातील भडगाव रॊड वरील दांडिया रास कार्यक्रमात सिंधी कॉलनी रहीवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी (२६) हा दाडींया खेळत असतांनाच त्याची तब्येती खराब झाल्याने त्याला तात्काळ विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल केले यावेळी डॉ भुषण मगर यांच्या सह वैद्यकीय टिम ने शर्थीचे प्रयत्न करुन देखील यश मिळाले नाही.. यावेळी या घटनेची वार्ता शहरात पसरली असता सर्वांनी हॉस्पिटल कडे धाव घेतली असता कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील तात्काळ भेट दिली. स्व. लखन वाधवानी हा दांडीया प्रेमी मध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी दांडीया किंग चा माणकरी ठरत होता. त्याच्या परीवाराची अत्यंत नाजुक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंप वर कामाला होता. त्याच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे