माहिजी येथील देहविक्री व्यवसाय बंद करा नागरिकांची मागणी
पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील वर्षानुवर्षे सर्रासपणे देहविक्री व्यवसाय सुरू असून यामुळे येथील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावा, यासाठी पाचोरा प्रांताधिकारी व पाचोरा पोलिसांना डॉ निलकंठ पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांनी निवेदन देत तत्काळ देहविक्री व्यवसाय स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे.
या ठिकाणी येणारे युवक तसेच ग्राहक आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांमध्ये पत्ता विचारतात, यामुळे गावात राहणारे नागरिक अक्षरशः कित्येक वर्षापासून हैराण झाले असून, या गावात राहणाऱ्या महिला वर्गासह नागरिक संताप व्यक्त करीत आहेत, सदर देहविक्री व्यवसाय गावातील जि प शाळे जवळच असून या ठिकाणी अवैध सुरू असलेला कुंटणखाना मुळे तरुण मुला मुलींचे लग्न होत नाही, या प्रकारामुळे गावातील लहान, तरुण मुलं मुलींवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून शासनाने दखल घेवुन देहवीक्री व्यवसाय करणाऱ्यांचे स्थलांतर करण्यात यावे, अश्या मागणीची निवेदन, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले आहे.
निवेदन देती वेळी पाचोरा वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक, डॉ. निळकंठ पाटील यांच्यासह माहिजी येथील गावकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



