आपल खान्देश

खान्देशातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोलभाऊ शिंदे सन्मानित..



पाचोरा व भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख युवा नेते अमोलभाऊ शिंदे यांना लोकमत तर्फे “लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश” या पुरस्काराने गौरवण्यात आले. आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी कोल्हे हिल्स येथील एका दिमाखदार समारंभात ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबभाऊ पाटील, यांच्या हस्ते अमोल शिंदे यांना “लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश” हा पुरस्कार देण्यात आला. 

याप्रसंगी व्यासपीठावर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, धुळे येथील आमदार अमरीश भाई पटेल, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, लोकमतचे संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते. 

या निमित्ताने खानदेशातील निवडक पुरस्कारार्थी नेतृत्वाचा प्रोफाइल असलेले कॉफी टेबल बुक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. खानदेशातील राजकारण आणि समाजकारणात क्रियाशील असलेल्या गुणवंत नेतृत्वांचा सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने झाला. लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. लोकमत चे महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले. हा पुरस्कार स्वीकारताना अमोल भाऊ शिंदे यांचे समवेत भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील,पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे