पहूर पोलिसांची कामगिरी दमदार, सराईत गुन्हेगारांना अटक..
पहूर , ता . जामनेर ( ता . ३ ) जामनेर तालुक्यातील पहूर परिसरातील शेत शिवारात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली, गेल्या १५ दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक स्थापन करण्यात आले आहे.
गस्तीवर असताना फिरोज खाटीक, इरफान शेख, फातिम शेख ( रा . मदनी नगर , जामनेर ) हे संशयास्पद रित्या आढळून आले, यांना अटक करून त्यांच्या जवळील साडेसात हजार रुपयांची रोकड व लोखंडी टॅमी जप्त केली. याप्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . गस्तीपथकात दीपक सुरवाडे, विनोद पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, राहूल पाटील, अमोल पाटील, गोपाळ गायकवाड यांचा समावेश होता.



