गिरणा नदीवरील पुलावरून दुचाकी चालवत नेणे बेतले जीवावर !
Girana River Rescue | भटंगाव पूलावरून दुथडी वाहणाऱ्या गिराणा पात्रता बुडणाऱ्या बालकांसह दोन जणांना वाचवण्यात यश..
पुलावरून दुचाकी चालवत नेणे बेतले जीवावर,
भडगाव तालुक्यातील भटगाव पुलावरून भातखंडे येथील दोन जण बालकां सह दुचाकी वरून गावाकडे निघाले होते त्यांनी दुथडी वाहत असलेल्या गिरणा नदी पात्रावरील भटगाव पूलावरून आपली दुचाकी नेण्याचे धाडस केले आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह नदी पात्रात पाण्यात पडले बुडत असताना क्षणाचा विलब न करता आदिवासी बांधवानी त्यांना दोरखंडाच्या सह्याने वाचवले. या आदिवासी बांधावामळे माेठा अनर्थ टळला. ठरली. प्रथम दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आपल्या सहकाऱ्यांना सोबत यांनी एक बालक दोन तरुणांचा जीव वाचवला.
किनाऱ्यावरुन दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते. जीवनमरणाच्या हिंदोळ्यावरचा हा काही क्षणांचा खेळ किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांचेच प्राण कंठाशी आणत होता. त्यानंतर सर्वजण किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.



