आपल खान्देश

पाचोऱ्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यासाठी मार्ग सुकर

  • दिलीप जय परदेशी.

पाचोरा शहरात आंबेडकरी समाजाचा जिव्हाळाचा विषय म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवायची मागणी होती आमदार किशोर पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत बैठकितून कायदेशिर बाबींची कागदोपत्री पुर्तता करण्यात आली.

समाजसेवक प्रविण ब्राह्मणे यांनी वेळोवेळी विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आज सदर प्रकरणाची गती वाढवण्यासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन चर्चा केली व काही तांत्रिक अडचणीसाठी कागदोपत्राची पुर्तता करण्यात आली स्मारकाची उंची वाढवण्यासाठी आता कुठलीच अडचण येणार नाही, व उच्च दर्जाचे स्मारक पाचोऱ्यात होईल अश्याच यानिर्णयावर फुले शाहू आंबेडकर विचारांचे जनतेला व सर्वसामान्य जनतेला आनंद झाला.

आमदार किशोरआप्पा पाटील, पाचोरा नगरपालीका मुख्याधिकारी देवरे, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, मार्केट कमिटी सभापती गणेशबापु पाटील, प्रविणभाऊ ब्राम्हणे, व  भिमराव खैरे उपस्थित होते.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे