आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता मागितली लाच!

सदर सरपंचांनी सांगितल्यानंतर पंटर बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील सरपंचाने १० हजाराची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना खाजगी इसमाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली. अनिल विश्राम पाटील (वय ४६ वर्षे) असं सरपंचाचे नाव असून बलराम हेमराज भिल (वय ४६ वर्षे) असं खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नव्हती. त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दि. २७ रोजी १० हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली. 

शुक्रवारी दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे