आपल खान्देश
आमदार कुणाल पाटील यांच्या काकुंचे निधन
धुळे- माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे ज्येष्ठ बंधू माजी जिल्हाधिकारी स्व. भास्करराव पाटील यांच्या पत्नी ग.भा.शकुंतलाताई भास्करराव पाटील यांचे आज दि.1 जुलै 2021 रोजी सायं. 6 वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या काकू होत्या.
एकेकाळी नावाजलेले व शिस्तप्रिय म्हणून ज्यांचा महाराष्ट्रात उल्लेख होत होता असे माजी जिल्हाधिकारी स्व. भास्करराव पाटील यांच्या पत्नी ग.भा.शकुंतलाताई भास्करराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील व मुलगी सौ भाग्यश्री कदम यांच्या त्या आई होत्या. त्यांच्यावर जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळे येथे उपचार सुरू होते. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि अखेर त्यांची आज प्राणज्योत मालावली. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्ष होते. प्रसिद्ध उद्योगपती विनय पाटील, खानदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात डॉ. आशिष पाटील, श्री नेहल पाटील, उद्योगपती उत्कर्ष पाटील आणि डॉ. ममताताई पाटील, डॉक्टर स्मिताताई पाटील यांच्या त्या काकू होत्या. माजी मंत्री पद्मश्री शामराव कदम यांचे सुपुत्र डाॅक्टर अशोक कदम हे त्यांचे जावई आहेत. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर हे त्यांचे माहेर होते. तर दलित मित्र हाजीसाहेब महारु म्हसु पाटील यांच्या त्या कन्या होत्या तर शेतकी संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भाऊराव पाटील यांच्या त्या भगिनी होत्या.
आणि चाळीसगाव तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भाऊराव पाटील यांच्या त्या आत्त्या होत्या.
माजी जिल्हाधिकारी स्व. भास्करराव पाटील यांना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खंबीरपणे साथ दिली होती.
स्व. भास्करराव पाटील यांच्यासोबत त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी,सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 2 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वा. मोहाडी प्र. ल.धुळे येथून निघणार आहे.





