बद्रीनाथ धामचे पाचोऱ्यात दर्शन, हुबेहूब बद्रीनाथ मंदिराचा देखावा साकारला…
पाचोरा शहरात विविध गणेश मंडळाकडून परंपरेनुसार लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक मंडळाकडून आकर्षक देखावे देखील साकारण्यात आलेय. अशातच एक सुंदर असा देखावा पाचोरेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. पाचोराचे युवानेते सुमित किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून हुबेहूब बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीय.
- पहा येथे व्हिडीओ
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक पाचोऱ्यात रांगा लावत आहेत. पाचोऱ्यातील युवानेते सुमित किशोर पाटील संकल्पनेतून यावर्षी बद्रीनाथ मंदिर देखावा साकारला आहे. पाचोऱ्यात गेल्या तीन वर्षापासून हिंदू मंदिरांचा सुंदर देखावा सादर केला जात असून भाविकांच्या पसंतीस उतरत असून दरवर्षी प्रमाणे पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केला जातो. पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ युवानेते सुमित किशोरआप्पा पाटील संकल्पनेतून गणेश उत्सवात गेल्या तीन वर्षापासून भारतातील सुप्रसिद्ध मंदिराचा देखावा साकाराला जात आहे, या आधी काशी विश्वनाथ मंदिर, श्रीराम मंदिर देखावा तर या वर्षी हुबेहूब बद्रीनाथ मंदिराचे दर्शन होत आहे.
केदारनाथ मंदिराच्या थीमवर साकारलेल्या भव्य गणपतीच्या मूर्तीच्या दर्शनाबरोबरच गणपती बाप्पा मोरयाच्या पूजेसाठीही भाविकांची झुंबड उडाली आहे.




