आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यातील झेरॉक्स व्यवसायिक प्रभू राजपूत यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या !

पाचोरा तहसील कार्यालय आवाराच्या झेरॉक्स व्यावसायिकाने स्वत:च्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे सुमारास उघडकीस आली. परभतसिंग (प्रभू) केशरसिंग राजपूत (वय 52) असे मृत  व्यावसायिकाचे नाव आहे. पाचोरा पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.  त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

पाचोरा येथील तहसील आवारात पोलीस स्टेशनजवळ एका झेरॉक्स दुकानचालकाने आपल्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील भडगाव रोडवरील पांडव नगरी भागातील रहिवासी तथा पाचोरा पोलीस स्टेशनजवळील गणेश झेरॉक्सचे चालक परभतसिंग केशरसिंग राजपूत (वय ५२) याने रविवारी सकाळी  दुकानातच दोरीच्या साहयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ग्रामीण रुग्णालयाचे १०८ वाहनावरील चालक किशोर पाटील यांच्या नजरेस पडल्याने त्यांनी तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयतास ग्रामीण रुग्णालय हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. 

आत्महत्येचे कारण समजून आले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवनकुमार पाटील हे करीत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे