आपल खान्देश
नगरदेवळा येथील प्रियंका डिजीटल बॅनर छपाई मशीनचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.
- संजय परदेशी
पाचोरा (झूम मराठी वृत्त) तालुक्यातील नगरदेवळा येथील प्रियंका ऑफसेट आणि डिजीटल बॅनर छपाई मशीनचे शुभारंभ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आज दि.8 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले.
यावेळी जळगाव जि.प.च्या नगरदेवळा बाळद गटाचे मा.सदस्य तथा शिव सेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शिवनारायण जाधव,अविनाश कुठे,ज्येष्ठ नागरिक दलपत आप्पा पाटील, मा.सरपंच नामदेव भाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरदेवळा सारख्या ग्रामीण भागात डिजीटल बॅनर झपाईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रियंका ऑफसेटचे संचालक चि.यश अंजली अनिल पाटील यांना आ.पाटील यांनी धन्यवाद दिले,यावेळी रावसाहेब पाटील यांनीही या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरदेवळा गावातील ग्रामंस्थ, पत्रकार बांधवांसह परिसरातील ग्रामंस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



