जळगाव मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्णा दूंदूले
अमित ठाकरे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र प्रदान
- दिलीप जय परदेशी.
जळगाव (झूम मराठी) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी श्रीकृष्णा दूंदूले यांची नेमणूक अमित ठाकरे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलनं करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवं. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच ओमराव सूर्यवंशी यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी निलेश मराठे यांची पाचोरा शहराध्यक्षपदी, भडगाव तालुकाध्यक्षपदी अक्षय दिनकर पाटील, परवेज पठाण शहराध्यक्षपदी, चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी दिलीप शेरे, शहराध्यक्षपदी किशोर कसबे, पारोळा तालुका अध्यक्षपदी रवींद्र पाटील, शहराध्यक्षपदी किरण माळी, एरंडोल तालुकाध्यक्षपदी संदीप राठोड, यांची निवड करण्यात आली.
- कोण आहेत श्रीकृष्णा दूंदूले !
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत असलेले तसेच पाणीपुरीचा व्यवसाय करणारे होतकरू श्रीकृष्णा दूंदूले यांना मनवीसे जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे. त्यांची सुरुवात अगदी महाराष्ट्र सैनिक या पदावरून झाली आहे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या शाखाध्यक्ष पद आता थेट जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. विध्यार्थ्यांसाठी नेहमीच आंदोलनात आक्रमक चेहरा व कार्यकर्त्यासोबत असलेला जनसंपर्क त्यासोबतच संघटन करण्याची धमक त्यांच्यात आहे.





