आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

Jalgaon News | बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या टोळीला अटक!

भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना बुधवारी (दि.४) सायंकाळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक शनिवार पेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, अब्दुल अमित चौक रसलपुर रोड रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येत आहेत, अशी गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. नुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार करून भुसावळ शहरात सापळा रचला. व बनावट नोटांसह बुधवारी तिघांना अटक केली. संशयित एक लाखाच्या खर्‍या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याने पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यावर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांकडून नोटांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे