आपल खान्देश
पाचोरा एमआयडीसी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी विक्रांत किशोर पेंढारकर बिनविरोध निवड
पाचोरा येथील मोंढाळा रोडवरील एमआयडीसी संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत सदरची निवड करण्यात आली, यावेळी संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन विक्रांत कीशोर पेंढारकर यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन विक्रांत पेंढारकर हे महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष किशोर पेंढारकर यांचे सुपुत्र आहेत. नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन विक्रांत किशोर पेंढारकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




