आपल खान्देशसखी

चाळीसगावच्या मेहुणबारे येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

चाळीसगाव (झूम मराठी) सकल धनगर समाज चाळीसगाव तालुका यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तिथी नुसार पुण्यतिथी निमित्ताने मेहुनबारे आणि बहाळ येथे हरिद्वार येथील साधू स्वामी परमेश्वरानंद गीरिजि महाराज यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात कुशल प्रशासकांच्या यादीमध्ये अनेक कुशल राज्यकर्त्या स्त्रियांनीही नावे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील पितृसत्ताक संस्कृतीला तडा देणारे एक नाव म्हणजे “अहिल्याबाई होळकर” (Ahilyabai Holkar) आहे. अशा कर्तुत्ववान स्त्रीयांमुळे महाराष्ट्राला धाडसी स्त्रियांचा वारसा लाभला आहे. अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील जामखेड मध्ये झाला होता. उत्तम शासक आणि योग्य न्याय करणारी राणी म्हणून त्यांची ओळख होती. राणी अहिल्यादेवी यांनी भारतात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर आणि इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक आणि परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

यावेळी मेहुनबारे सरपंच रवींद्र साळुंखे , संदीप दादा लांडगे, छबुलाल गढरी , संजय गढरी, संतोष पवार, अनिल निकम, योगेश निकम, शरद देवरे, भैय्या गढरी, बाबुराव गढरी, कैलास गढरी, अशोक गढरी, बबलू गढरी, सुभाष निकम, झुलाल गढरी, मोहन गढरी, सुरेश गढरी, भानुदास गढरी, सुभाष गढरी, गोपीचंद पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे