आपल खान्देश

Pachora | डॉ नीलकंठ पाटील यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन भव्य दिव्य आयोजन

या मेळाव्यात महिलाची लक्षनीय उपस्थिती होती.

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा भडगाव तालुक्यातील प्रसिद्ध हॉस्पिटल वृंदावन हॉस्पिटलचे डॉ नीलकंठ पाटील यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन पाचोरा शहरातील, भडगाव रोड लगत दैवयोग हॉल येथे करण्यात आले होते, या मेळाव्यात हजारो महिला उपस्थित होत्या. 

ह्या महिला मेळाव्यात  पाचोरा भडगाव तालुक्यात डॉ नीलकंठ पाटील यांनी आपली ताकद कमी दिवसात किती आहे हे दाखवून दिले

या महिला मेळाव्यात पाचोरा भडगाव तालुक्यातील हजारो महिला उपस्थित होत्या, मेळाव्याच्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी प्रचंड कल्याणकारी योजना अमलात असून या योजनेचा प्रत्येक भारतीय महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ नीलकंठ पाटील यांनी उपस्थित महिला वर्गांना केले. केंद्र शासनाने महिलांसाठी उज्वला मोफत गॅस व नुकताच राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Majhi Ladki Bahin Yojana) व प्रति वर्षाला अन्नदान योजनेअंतर्गत तीन गॅस मोफत देण्याची योजना यासह संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यासह इतर असणार्‍या महिलांसाठी कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व मोदी सरकारने देशातील महिलासह इतर कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ दिला तर नवर्‍याच्या पतीवर पत्नीचाही कायम हक्क राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता महिलांनी अन्याय अत्याचाराच्या बळी पडू नये त्यांनी कृतृत्ववान व स्वाभिमानी जीवन जगून निर्भीडपणा जपला पाहिजे तरच महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे तसेच मातृशक्तीला देव, देश, धर्म, याविषयी महिलांची भूमिका काय असली पाहिजे याविषयी सामाजिक संदेश  आपल्या भाषणात डॉ नीलकंठ पाटील यांनी संबोधित करतांना सांगितले. 

मेळाव्यात महिलांची भूमिका  विषयावर मीनाक्षी ताईनी मार्गदर्शन केले, पूज्य तपस्विनी गरुवर्य आई (महानुभाव पंथ) पाचोरा यांचा सत्कार मयुरीताई पाटील यांनी केला. अनुलोम संस्था दत्ताजी नाईक (उप विभाग जनसेवक जळगांव) सामाजिक कार्यकर्ते विकास लोहार यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाची माहिती सांगितली विशेष समाजाला आदर्श निर्माण करून देणाऱ्या रिक्षा चालक आशाताई भुजंग, पाचोरा शहर  कांताबाई संभाजी चौधरी यांनी एकरी 23 क्विंटल कापूस दादा लाड तंत्र वापरून विक्रमी उत्पन्न घेतले, यांना मॉ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. विठ्ठल बागुल वैद्यकीय आघाडी भाजपा. ता. जामनेर यांचा सत्कार डॉ. विजय पाटील यांनी केला.  मधुभाऊ काटे जि. सरचिटणीस भाजपा. जि.प. सदस्य, यांचा सत्कार डॉ. निळकंठ पाटील यांनी केला. साधना देशमुख भाजपा माजी महिला ता. पाचोरा आघाडी यांचा सत्कार, अर्चना पाटील यांनी केला, वैशाली काबरा (उद्योजक) सौं. स्वाती ताई कुलकर्णी सौं स्मिता ताई सराफ वनवासी कल्याण आश्रम सामाजिक कार्यकर्त्यां उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे