आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या बाजूला घन कचऱ्याला लागली आग, मोठा अनर्थ टाळला!

झूम मराठी वृत्त

पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या बाजूला सांडू भाऊराव कॉम्लेक्सच्या ओपन स्पेस मधील घन कचऱ्याला अचानक आज 12 वाजून 25 मिनिटांनी आग लागली होती तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली, सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही

पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या बाजूला सांडू भाऊराव कॉम्लेक्सच्या ओपन स्पेस मधील घन कचऱ्याला अचानक आग लागल्याने सर्वदूर धुर पसरला होता आग लागल्याचे लक्षात आल्याने मधुराज डिजिटलचे सुनील सोनार, सतीश पाटिल, पाचोरा टी चे प्रवीण मुळे, समाधान मुळे कुणाल मोरे, यांनी वेळीच धावपळ केली . सुनील सोनार यांनी अग्निशमन दलात फोन केला तसेच पाचोरा येथील अग्निशमन दलाने वेळेचा विलंब न करता राजू पाटील भिकन गायकवाड या अग्निशमन जवानानी आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टळला. आगीच्या जवळच विघ्नहर्ताचा हॉस्पिटलचा डिझेल जनरेटर होता व ऑक्सिजन सिलिंडर होते सुदैवाने आग आटोक्यात आणली गेली नाहीतर मोठा अनर्थ झाला असता.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे