आपल खान्देश

तोंडात बॉम्ब फुटलेल्या गाईचा अखेर मृत्यू !!

गोवे-कोलाड (जिल्हा रायगड-प्रतिनिधी प्रभाकर गंगावणे) पाच दिवसापूर्वी सुतारवाडी पासून जवळच असलेल्या ढोकळेवाडी येथील वैभव गोरीवले यांच्या जर्सी गायीच्या तोंडात बॉम्ब फुटला होता.

नेहमीप्रमाणे जर्सी गाय जंगलात माळरानावर चरायला गेली होती. त्या ठिकाणी शिकारीच्या हेतूने कोणीतरी बॉम्ब ठेवला होता तो पदार्थ समजून चघळण्यास सुरुवात केली असता त्या बॉम्बचा गाईच्या तोंडात स्फोट होऊन गाईच्या तोंडाचा खालचा जबडा निकामी झाला होता. त्यामुळे दुभती गाय अन्नपाणी काहीच खात नव्हती. ती बरी होण्यासाठी गोरीवले यांनी शर्थीने प्रयत्न केले अखेर त्या गायीने अखेरचा श्‍वास घेऊन प्राण सोडला. गाय मृत्यू पावल्याने गोरीवले यांचे खूपच नुकसान झाले आहे.

परंतु जंगलात शिकारीसाठी असे अनेक बॉम्ब ठेवलेले जात आहेत.अशा बॉम्बने मुक्या गाईचा मृत्यु झाला. परंतु या जंगलातुन जंगली प्राण्यासह नागरिक ही ये-जा करीत असतात असे बॉम्ब ठेवणार्‍या शिकार्‍यांवर लक्ष ठेवून वन खात्याने कठोर कार्यवाही करावी. अन्यथा एखाद्या व्यक्तीचा त्यावर पाय पडला किंवा अन्य प्राण्यांनी तो खाण्याचा प्रयत्न केल्यास जीवित हानी होऊ शकते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे