रोहिले बु. ग्रामसभेत अतिक्रमण काढणे ठराव सर्वानुमते मंजूर
रोहिले बु. ग्रामसभेत अतिक्रमण काढणे ठराव सर्वानुमते मंजूर झाला असून
नांदगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामसभा आज दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी बुधवारी ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा खेळीमेळी संपन्न संपन्न झाले असून प्रमुख्याने येथील गावातील सर्व लहान मोठे केलेल्या अतिक्रमणे हटविण्याबाबत ( उठविणे बाबत)
- बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.
मौजे रोहिले बुद्रुक येथे काल दिनांक 16 नोव्हेंबर2021 रोजी मंगळवारी ग्रामसभा घेण्यात आली नव्हती त्यामुळे आज दिनांक2021 रोजी बुधवारी सकाळी ठीक दहा वाजता येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. या ग्राम सभेचे सचिव म्हणून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी ग्रामसभेचे काम पाहिले

या ग्रामसभेमध्ये येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ( मालकाचे ) जागेवर ग्रामपंचायतीमार्फत तार कंपाउंड करण्यात आले असून त्या जागेचा बाबासाहेब आंबेडकर स्मारक ( पुतळा ) जागेच्या नावाची ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ 8 मध्ये नोंद करून क्षेत्रफळा सह नोंदीचा उतारा मिळावा तसेच येथील सार्वजनिक जागेवरील भूखंड क्रमांक तीन हा सण 2012 मधील ग्रामसभेत बौद्ध धरण्यासाठी सामाजिक, धार्मिक, इतर कार्यक्रम करण्यासाठी देण्यात यावा असा ठराव ग्रामपंचायतीने त्या वेळच्या सरपंच ग्रामसेवक यांनी ठराव मंजूर केला होता.
परंतु 2017 – 2018 मध्ये त्यावेळचे सरपंच रमाबाई नरवडे व ग्रामसेवक एन एस तडवी यांनी हा भूखंड क्रमांक तीन बुद्धविहाराला जागा दिलेली असतानाही तीच जागा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार करून 2012 मधील ठराव धाब्यावर ठेवून ग्रामपंचायतीचे ग्राम रोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज, आणि सुनिल तुकाराम अरबूज यांना बुद्धविहाराचे जागेवर व जागे समोरील जागा अतिक्रमण करून ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 11 च्या रजिस्टर मध्ये नोंद केली होती. तर या दोन लोकांचे नोंदी रद्द करून त्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावा असा अर्ज येथील सविधान आर्मी चे अध्यक्ष रवींद्र यादव बागुल उपाध्यक्ष सुभाष बाजीराव बागुल, सचिव विशाल अशोक बागुल, तर वंचित बहुजन आघाडीचे रोहिले बुद्रुकचे कल्याण तातेराव बागुल
सविधान आर्मी चे जातेगाव गंड प्रमुख अनिल केशव बागुल, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रतन बागुल, सविधान आर्मी चे शाखेचे संतोष रमेश बागुल, प्रल्हाद केशव बागुल, जितू मनोहर बागुल, राजेंद्र छगन बागुल, आणि सविधान आर्मी चे नांदगाव तालुका युवक अध्यक्ष प्रवीण बाजीराव बागुल व गावातील बौद्ध समाजाचे नागरिकांनी आज ग्रामसभेत ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज दाखल केला हा अर्ज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी वाचून दाखविला व तो अर्ज ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आला.
तसेच येथील बाबासाहेब तुकाराम अरबूज यांनी गावातील उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी याच गावातील सर्व लहान-मोठे अतिक्रमणे काढण्यात यावा असा अर्ज ग्रामसभेत देण्यात आला व तो अर्ज देखील मंजूर करून अतिक्रमणे काढणे बाबत ठराव आजच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
अशी माहिती येथील सरपंच ठकुबाई देविदास पवार, ग्रामसेवक भगवान जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले हे अतिक्रमण काढणे संदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे स्मारक आणि बुद्ध विहारा च्या जागेबाबत 8 च्या रजिस्टर मध्ये नोंदी करून उतारे बनविण्यात येतील व ते उतारे येथील ग्रामस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना देण्यात येतील असे ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला.
या ग्रामसभांचे सभेच्या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल, रामदास सावळीराम पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब साहेबराव बागुल, जनार्धन गायके, बाबासाहेबा अरबूज, शिवराम सावळीराम पवार, लक्ष्मण पवार, कैलास रामहरी गायके, राजेंद्र रंगनाथ पवार व ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते ही ग्रामसभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामसेवक भगवान जाधव आणि सविधान आर्मी चे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष किरण बागुल यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.


