मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे . या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार असून तशा प्रकारच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आले होते. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकार काळातही गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता.




