लोहारा विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी..
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी दारासंचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके मॅडम होत्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांनी केले व शाहू महाराजांच्या जीवनाविषयी माहिती दिली तसेच शिक्षकांमधून पी यु खरे सर यांनी शाहू महाराजांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व शरीर सुदृढ राहावे यासाठी व्यायामाचे महत्त्व तसेच शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणा कोल्हापूर बांधारयाची निर्मिती तसेच अनेक सामाजिक उपयोगी केलेल्या सुधारणा याविषयीची माहिती उपस्थितांना दिली या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार आर के सुरवाडे सर यांनी मांनले



